चार दशकांनंतर ‘जुने दिवस’ परतले; सोळु शाळेतील 1985च्या विद्यार्थ्यांचा हृद्य गेट-टुगेदर

सोळु : “तो वर्ग, ती बाकं, ती घंटा, आणि तेच ओळखीची चेहरे… ४० वर्षांनी पुन्हा भेटल्यावर डोळे पाणावले!”
अशा भावना व्यक्त करत, सोळु जिल्हा परिषद शाळा (जिवन शिक्षण मंदिर) येथे 1985 सालचे सर्व विद्यार्थी 3 ऑगस्ट 2025 रोजी एका संस्मरणीय गेट-टुगेदरमध्ये एकत्र आले.

या हृद्य क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी शाळेचे आदर्श शिक्षक श्री. निवृत्ती बिठोबा जगताप, शिक्षिका आशाताई तापकीर (ठाकुर) आणि मुक्ताताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जुन्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत गुरूंच्या दर्शनानेच आनंदाश्रू दाटून आले.

कार्यक्रमात माजी सभापती रामदास नामदेव ठाकुर, भाऊसाहेब ठाकुर, बाळासाहेब ठाकुर, जितेंद्र मेहता, अशोक गोडसे, आदर्श शिक्षिका जयश्री गोंडाबे, ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह दैनंदिन एजंट शोभाताई पठारे यांसह एकूण 30 माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.

चार दशकांपूर्वीच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत, त्या काळातील गमती-जमती, वर्गातील खोड्या, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जीवनातील घडामोडी या सगळ्या गप्पांमध्ये तास निघून गेले. एकेकाळी लहानग्यांच्या हसण्याने गजबजणाऱ्या शाळेत पुन्हा एकदा हास्य आणि भावूक क्षणांची रेलचेल दिसली.

या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी एकदिलाने परिश्रम घेतले. शेवटी, “ही फक्त भेट नव्हती, तर आयुष्यातील एक सुवर्णक्षण होता” अशा भावना व्यक्त करत भविष्यात अशा गेट-टुगेदरचे नियोजन करण्याचा संकल्प सर्वांनी केला.

news portal development company in india
marketmystique