खालुंब्रे : ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी खालुंब्रे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मामा बोत्रे, बाळासाहेब कारले, ओळख ज्ञानेश्वरी चे मार्गदर्शक शिक्षक जी. पी. पालवे, शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर, मुख्याध्यापिका वंदना यादव आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत दत्तात्रय मामा बोत्रे यांनी करताना विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. अर्जुन मेदनकर यांनी संत साहित्यातून व्यक्तिमत्व विकास आणि भारताचे भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत, संस्कारक्षम घडावेत यासाठी हा उपक्रम मुलांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या विशेष प्रयत्नात१०८ शाळांत उपक्रम पोहोचल्याचे त्यांनी सांगत हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरी हा जीवन ग्रंथ असल्याचे सांगितले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वरी