श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे 26 जानेवारी 2026 रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या तेजस्वी वातावरणात आणि मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय सोहळ्याने संपूर्ण शाळा परिसर देशप्रेमाच्या भावनांनी भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम, ड्रिल, डंबेल्स प्रदर्शन तसेच शिस्तबद्ध संचलनाने (परेड) उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या सादरीकरणांतून विद्यार्थ्यांची शिस्त, आत्मविश्वास, संघभावना व शारीरिक तंदुरुस्ती यांचे प्रभावी दर्शन घडले.
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर भाषणांमधून भारताच्या संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व, नागरिकांची जबाबदारी तसेच थोर महापुरुषांचे वैचारिक मूल्ये ठळकपणे मांडण्यात आली.
समर्थ पतसंस्था रौप्य महोत्सवाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. शिक्षण हाच राष्ट्रनिर्मितीचा मजबूत पाया असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी श्री समर्थ स्कूल व कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर , सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, मूल्यनिष्ठा, शिस्त व जबाबदारीने जीवन जगण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. हा भव्य सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित करून गेला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने
श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अमोल गवारी साहेब,
खजिनदार मा. श्री. संतोष लक्ष्मण गवारी साहेब,
संचालक मा. श्री. उमेश येळवंडे साहेब,
श्री समर्थ पतसंस्थेचे संचालक मा. श्री. बाळासाहेब कातोरे साहेब,
श्री समर्थ स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या मा. सौ. अनिता टिळेकर मॅडम,
तसेच सौ. सुनिताताई नाटक, सौ. नंदाताई येळवंडे, सौ. रुपालीताई पवळे,
आणि श्री. नितीन चव्हाण, श्री. सुधीर मुंडे, श्री. ज्ञानेश्वर कदम, श्री. संतोष बोराटे,
विभागप्रमुख (HOD), शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वंदे मातरम्’ या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

news portal development company in india
soical Sharing