श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजची शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न
चिंबळी, दि. १८ जुलै : श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात प्रभावी संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव गवारे सर व संस्थेच्या सचिव मा. सौ. विद्याताई गवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेला संस्थेच्या सीईओ तथा प्राचार्या सौ. अनिता वसंत टिळेकर मॅडम, सौ. रुपालीताई पवळे मॅडम, श्री समर्थ स्कूलच्या प्राचार्या सौ. नीतू अरोरा मॅडम, समन्वयक सौ. अनिता लंके मॅडम, सौ. ललिता बडदे मॅडम,सौ.रुपाली सपकाळ मॅडम, प्री-प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. विषमा पवार मॅडम, एचओडी सदस्य सौ. सपना टाकळकर मॅडम, सौ. दीपाली थोरात मॅडम, श्री. अजित थोरात सर शिक्षिका मंगल अनाप मॅडम,सौ.राधा सोंडगे मॅडम,भावना महाजन मॅडम,रुपाली नाटक मॅडम,रुपाली कांबळे मॅडम, योगिता पाटील मॅडम,रुपाली कोकणे मॅडम,श्री.संतोष गवई सर,शंकर लांडगे सर, यांच्यासह सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. सुवर्णा धावारे मॅडम यांनी केले. त्यानंतर कॉलेजच्या शिक्षिका सौ. निलम डोंगरे मॅडम तसेच इयत्ता बारावी (कॉमर्स) च्या विद्यार्थ्यांनी शब्दसुमनांनी पालकांचे स्वागत केले.
यावेळी सहशिक्षिका सौ. वैशाली पटले मॅडम व सौ. लक्ष्मी देसाई मॅडम यांनी शाळेचे नियम, शिस्त व विविध उपक्रमांची माहिती पालकांना दिली. त्यानंतर प्री-प्रायमरी ते कॉलेज विभागातील सर्व शिक्षकांनी पालकांशी संवाद साधत स्वतःचा परिचय करून दिला.
सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांची संयुक्त भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. प्राचार्या सौ. नीतू अरोरा मॅडम यांनी पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्याप्रती असलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असे आवाहन केले.
सीईओ तथा प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम आणि समन्वयक सौ. अनिता लंके मॅडम यांनी पालकांच्या विविध शंकांचे समाधानकारक निरसन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा व पालक यांच्यात सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बस संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष गवारे सर यांनी मुलांच्या बस संदर्भात असणाऱ्या पालकांच्या विविध शंकांचे समाधानकारक निरसन केले.
यावेळी पतसंस्थेचे प्रतिनिधी श्री. दुर्योधन कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासंदर्भातील विविध आर्थिक सुविधांची माहिती पालकांना दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सचिव व संस्थेची कार्यकारणी व पालक यांच्यात फी संदर्भात चर्चा झाली व पालकांना शाळेची फी भरण्यासाठी विविध टप्पे ठरवून देण्यात आले.चालू शैक्षणिक वर्षाचे शाळेचे शुल्क सर्वानुमते ठरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. ज्योती कांगणे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ करण्यास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्याची भावना बळकट करण्यास ही सहविचार सभा उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






