खालुंब्रे येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, खालुंब्रे येथे १० मार्च २०२६ रोजी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील सुमारे १०० महिलांनी सहभाग नोंदवला, तर त्यापैकी ६० महिलांनी विविध खेळांमध्ये आनंदाने भाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आनंद आणि महिलांच्या सन्मानाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायाताई ठाकूर या उपस्थित होत्या. यावेळी त्यांचा धनश्री हगवणे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळ स्पर्धांमध्ये पुढील महिलांनी बाजी मारली –
प्रथम क्रमांक – मेश्राम अश्विनी
द्वितीय क्रमांक – घाडगे अश्विनी
तृतीय क्रमांक – माळी माधुरी
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रीता मॅडम यांनी केले, तर “खेळ रंगला” या मनोरंजक गेमचे आकर्षक संचालन सूरज सोमवंशी सर यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शन लाभले. श्री शिवाजीराव बाबनराव गवारे सर (संस्थापक अध्यक्ष, श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, मोई) तसेच विद्याताई गवारे मॅडम (सचिव) यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शीतल पवार, आरती वाघुले, गौरी झोडगे, स्नेहल जयसिंगपुरे, किरण पाटील, दिपाली भोसले, प्रीती पासवान, शिल्पा ढेरे, ऋतुजा पुंड, ज्योती सोनकांबळे, मिथाली मॅडम आणि अश्विनी मॅडम यांनी परिश्रम घेतले.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आणि आनंदाने भरलेला हा कार्यक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.






