श्री समर्थ पतसंस्था, हिंजवडी शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा
हिंजवडी : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंजवडी शाखेचा प्रथम वर्धापनदिन सोमवार, दि. २७ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व मान्यवर पाहुणे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विधिवत श्री सत्यनारायण महापूजेने झाली. त्यानंतर शाखेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून संस्थेच्या कार्याचे कौतुक करत आगामी काळात अधिकाधिक सभासदाभिमुख सेवा देण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सभासदांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
हिंजवडी शाखेने अवघ्या एका वर्षात ६ कोटी रुपयांच्या ठेवी, ३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करत ९ कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तसेच येणाऱ्या वर्षात २५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार शाखेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थापक/आधारस्तंभ श्री. संभाजीशेठ नथुजी गवारे, संस्थापक/अध्यक्ष श्री. शिवाजीराव बबनराव गवारे, खजिनदार श्री. संतोषशेठ लक्ष्मण गवारे संचालक सल्लागार श्री. समीर बुचुडे श्री. महेंद्र बुचुडे श्री. अक्षय गाढवे श्री. विनोद माझिरे श्री. दिपक ववले श्री. अमरदास भिंताडे श्री. भरत बोडके श्री. ओमकार दर्शले सौ. वंदना साखरे सौ. सविता साखरे श्री. योगेश भानुसे श्री मंगेश जांभूळकर श्री. मल्हारी बोडके श्री. सचिन जांभूळकर श्री. गणेश गवारे श्री. कुमार ठाकर. यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. महादेव आण्णा कोंढरे (माजी सभापती, पंचायत समिती, मुळशी), मा. श्री. दगडू काका करंजवणे (उपसभापती, पंचायत समिती, मुळशी) तसेच मा. श्री. अशोकराव राघु दर्शले (चेअरमन, प्रियदर्शनी वि. का. सह. सोसा.) यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवर, सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हिंजवडी शाखेचा प्रथम वर्धापनदिन सोहळा आनंदी, उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला.






