श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची खुल्या स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची खुल्या स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

चिंबळी, दि. २८ जून २०२६: किंग्स सर्कल स्केटिंग अकॅडमी यांच्या वतीने टेल्को स्केटिंग ग्राऊंड, अजमेरा, पिंपरी येथे आयोजित “३ री खुली स्केटिंग स्पर्धा २०२६” उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध शाळांमधील एकूण ५१२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, चिंबळी फाटा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. १६ वर्षाखालील मुले गटात *कु.आदेश अनिल कोठवळ* या विद्यार्थ्याने *कांस्य पदक* पटकावले, तर १७ वर्षाखालील मुले गटात *कु.वेदांत नागनपल्ले* या विद्यार्थ्याने *कांस्य पदक* मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
*विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक श्री. प्रतिक नेवसे सर ,सौ. रेणू किरपे मॅडम,सौ. माधुरी गरुड मॅडम व सुप्रिया सस्ते मॅडम यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर ,सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम, विद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम,सर्व शिक्षकवृंद, पालक तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*

news portal development company in india
soical Sharing