श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा

चिंबळी, दि. २२ जुलै २०२६ : चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी “उमलत्या वयाशी जुळवून घेताना” या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन ‘इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड’ यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे सर, संस्थेच्या सचिव मा. सौ. विद्याताई बबनराव गवारे मॅडम, श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या सी.ई.ओ. व प्राचार्या आदरणीय अनिताताई वसंत टिळेकर मॅडम, सर्व एच.ओ.डी. सदस्य तसेच ज्ञानप्रबोधिनी,पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक सौ. गायत्री जाधव, सौ. रोहिणी आठवले, सौ. परीमला पांडे, सौ. जयश्री तुंगार, सौ. माया अमृतकर, सौ. रश्मी जोशी, सौ. हेमांगी ठाकूर, सौ. शुभांगी देवधर, सौ. संगीता नेत्रगावकर, सौ. अमिता बेहेरे, श्री. संजीवदादा बेद्रे व श्री. अभयदादा ठकार उपस्थित होते.
यावेळी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ. दिपाली जाधव मॅडम, सचिव अॅड. आरती जाधव मॅडम तसेच सदस्य सौ. सोनाली गडसिंग, सौ. निवेदिता गाडगीळ आणि श्री. अविनाश जाधव सर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यशाळेत किशोरवयातील शारीरिक, मानसिक व भावनिक बदल, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, योग्य निर्णयक्षमता आणि सुदृढ व्यक्तिमत्त्व विकास याविषयी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तज्ज्ञांशी संवाद साधून विविध शंकांचे निरसन करून घेतले.
इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड ही महिलांची प्रतिष्ठित स्वयंसेवी सामाजिक संस्था असून समाजसेवा, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंना मदत अशा विविध क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उमलत्या वयातील आव्हानांना सकारात्मकपणे सामोरे जाण्याची दिशा मिळाली असून आत्मविश्वासाने, जबाबदारीने आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा लाभली.

news portal development company in india
soical Sharing