मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत विद्यार्थिनीचे उल्लेखनीय यश
चिंबळी ३१/०७/२०२६ : श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, चिंबळी फाटा येथील विद्यार्थिनी कु. सौम्या अतुल भाडळे हिने मंथन वेल्फेअर फाउंडेशन आयोजित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तिने या परीक्षेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक , जिल्हा स्तरावर ३५ वा क्रमांक तसेच राज्य स्तरावर ४२ वा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयासह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर , सचिव मा. सौ. विद्याताई गवारे मॅडम , विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. अनिता टिळेकर मॅडम , सर्व शिक्षकवृंद, पालक तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






