श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, निघोजे येथे इयत्ता ७वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी “अमली पदार्थांचे सेवन व त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम” या विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि व्यसनमुक्त समाजाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सर , पोलीस उपनिरीक्षक पिंजारी सर, महिला पोलीस शिपाई विद्या साठे मॅडम, प्राचार्य सौ. पल्लवी कुटे मॅडम,उपप्राचार्य सौ. ज्योती येळवंडे मॅडम तसेच सौ. साधना आल्हाट मॅडम आणि को-ऑर्डिनेटर सौ. प्रियंका येळवंडे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या या जनजागृतीपर उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

news portal development company in india
Recent Posts