तायक्वांदो स्पर्धेत प्रज्वल पवळे यांचे सुवर्ण यश!
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड; श्री समर्थ विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
चिंबळी फाटा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व क्रीडा अधिकारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्री समर्थ विद्यालय, चिंबळी फाटा येथील विद्यार्थी कु. प्रज्वल विकास पवळे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले.
प्रज्वल पवळे याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे श्री समर्थ विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रज्वलच्या या यशामध्ये त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. रेणू किरपे मॅडम, श्री. प्रतीक सर व सौ. माधुरी गरुड मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.
या गुणवंत खेळाडूचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर,सचिव मा. सौ. विद्याताई गवारे मॅडम, शाळेच्या प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या **प्रज्वल पवळे यास पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या!





