श्री समर्थ विद्यालयाचे तालुकास्तरीय ‘कराटे’ क्रीडा प्रकारात घवघवीत यश

चाकण ता.१८ -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य. पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कराटे क्रीडा स्पर्धा रविवार दिनांक 17/11 / 2024 रोजी रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.शिवाजीराव गवारे सर यांनी दिली. शासकीय क्रीडा स्पर्धांमुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहण्याबरोबरच या खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावी या बोर्ड परीक्षांमध्ये जास्तीचे वाढीव गुण तसेच भविष्यात नोकरीच्या संधी निर्माण होत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले प्राविण्य प्राप्त खेळाडू खालील प्रमाणे आहे

17 वर्षे वयोगट मुले / मुली
1) कु.कौस्तुभ रवींद्र येळवंडे-Gold
2)कु.प्रज्वल विकास पवळे-Gold
3)कु.ललित मोहनलाल चौधरी-Gold
4)कु.देव अलोक सरकार-Gold
5)कु. आदिती कुंडलिक आमटे-Gold
6)कु. मनीषा चौधरी-Gold
7) कु.सुमित गायकवाड-Bronze

19 वर्षे वयोगट मुले
1) कु.सन्मित मिसाळ-Gold
2)कु. श्रेयश मुक्कावर-Gold

14 वर्षे वयोगट मुले/मुली
1)कु.विभावरी चव्हाण-Gold
2)कु.स्वराज गवारे-Silver
3)कु.भाग्येश सावरे-Silver
4)कु.मानव बडगुजर-Bronze

वरील खेळाडूंनी विद्यालयाला भरघोस यश मिळवून दिले त्याबद्दल श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अध्यक्ष मा. श्री.शिवाजीराव गवारे सर, सचिव मा. सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम,प्राचार्य मा.सौ. अनिता टिळेकर मॅडम, प्राचार्य मा.सौ.वर्षा देशमुख मॅडम,प्राचार्य मा.सौ.पल्लवी कुटे मॅडम,प्राचार्य.मा.सौ.वंदना यादव मॅडम तसेच विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक प्रशांत तांबे सर,दिनकर बच्चे सर, सचिन जगताप सर, सुरज सोमवंशी सर अजित थोरात सर यांचे अभिनंदन करण्यात आले व विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

news portal development company in india
marketmystique