एसएससी रिझल्ट मध्ये श्री समर्थ चिंबळीफाटा येथील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

कुरुळी ता.13मे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (एस. एस. सी.बोर्ड) फेब्रुवारी व मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर मंगळवारी (ता.13मे) रोजी जाहीर झाला असून चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल व श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाने यावर्षीही निकालाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयाचा यंदाचा इंग्रजी माध्यमाचा निकाल100% लागला असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता टिळेकर यांनी दिली. श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा येथून एकूण 324 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते . या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट गुण मिळाले विद्यालयाचा माध्यम निहाय एकूण निकाल पुढीलप्रमाणे आहे.
इंग्रजी माध्यम 100%
सेमी माध्यम 96.11%
आमचे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे
इंग्रजी माध्यम
प्रथम क्रमांक बिसेन प्रणाली मनोजकुमार 95.20%
द्वितीय क्रमांक खोंडे अक्षदा निशांत 93.60%
तृतीय क्रमांक इंगवले जिगिषा प्रशांत 93.20%
चतुर्थ क्रमांक करंजखेले अनुष्का मच्छिंद्र 92.20%
इंग्रजी माध्यमाचे एकूण डिस्टिंक्शनमध्ये 99 विद्यार्थी आले असून
ग्रेड वन मध्ये 86 विद्यार्थी आले आहेत
तसेच 33 विद्यार्थ्यांना ग्रेट टू मिळाला आहे
सेमी माध्यम
प्रथम क्रमांक शिंदे राधिका रंगनाथ 94.80%
द्वितीय क्रमांक सय्यद नाजिया गुलाब 90.60%
तृतीय क्रमांक पुसे पूर्वा गुलाबराव 90.40%
चतुर्थ क्रमांक कौलगे अजिंक्यअमोल 90%
सेमी माध्यमांमध्ये
डिस्टिंक्शन मध्ये एकूण 34 विद्यार्थी आले असून
ग्रेड वन 42 विद्यार्थ्यांना व
ग्रेड टू 22 विद्यार्थ्यांना मिळालेला आहे
याप्रमाणे माध्यम निहाय निकाल लागला असून सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम व प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम, सौ विद्या पवार मॅडम, वंदना यादव मॅडम यांनी अभिनंदन केले आहे .त्यांना मार्गदर्शन करणारे सौ.मोनाली मुंगसे, शोभा तांबे, सपना टाकळकर, अश्विनी देवकर, अंकिता बोरकर, हसीना मणियार, दिगंबर कुलकर्णी, निखिल कांबळे,आरती क्षीरसागर, तेजश्री बंडगर, अजय स्वामी, सूरज सोमवंशी,विद्या सावंत, अनिता लंके, रूपाली पवळे, सपकाळ रूपाली ,बडदे ललिता , नाकट रूपाली ,अनाप मंगल ,राधा सोंडगे, पटले वैशाली, काजल अरगडे, सुप्रिया डोणे, ऐश्वर्या वाडेकर, स्नेहा दामले, तुषार तीवटणे, योगिता शिंदे, रेखा वायकुळे, वर्षा जावळे,शुभांगी शिंदे, गायकवाड कल्पना, ऋतुजा पुंड, अस्मिता पाटील,लक्ष्मी कश्यप ,पुष्पा घरत, नलगे स्मिता, दिपाली थोरात, अजित थोरात, सिद्धेश धोंडगे, विशाल डोळस ,रैनक जयश्री, रविना सपकाळे, मनिषा कुंभार, स्मृती गोंजारी, दिपाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.श्री समर्थ बस संघटना व श्री समर्थ पतसंस्था यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

news portal development company in india
marketmystique