चिंबळी फाटा : श्री समर्थ पतसंस्था चिंबळी फाटा या संस्थेची रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा जय गणेश बँक्वेट हॉल मोशी मोशी-आळंदी रस्ता ता. हवेली जि. पुणे येथे आयोजित केली असून विविध विषयांवर यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद बंधू-भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे संस्थापक संभाजीशेठ गवारे यांनी केले आहे.