चिंबळी फाटा. ता.१५ – श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज व श्री समर्थ पतसंस्था मध्ये ७८ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, स्काऊट गाईड व आर एस.पी.च्या विद्यार्थ्यांचे संचलन,देशभक्तीपर गीते,सामाजिक उद्बोधन करणारी नाटके या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर,सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम, पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी मा. श्री.अमोल गवारे सर, प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम,प्राचार्या मा.सौ.वर्षा देशमुख मॅडम यांच्या हस्ते श्री समर्थ पतसंस्था व श्री समर्थ विद्यालयासमोरील ध्वजारोहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संचालक मा.श्री.उमेशशेठ येळवंडे सर हे होते.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या पतसंस्थेच्या संचालिका सौ.नंदाताई येळवंडे, रूपालीताई पवळे, बस संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष गवारे,संतोष बोराटे,संतोष साकोरे ,प्रदीप लांडगे, रवींद्र देवरे, श्रीधर कुंभार, व्यंकट कुर्नापल्ले, सोपान मोरे ,सुधीर मुंडे ,गुरूप्रसाद वर्मा ,सुनील वाव्हळ, विष्णू पालवे, आप्पा कोळेकर,सौ.प्रतिभा केंद्रे,रुपाली खैरनार, मीरा भुजबळ,भाग्यश्री वंजारी,सपना गडगे यांच्या हस्ते इ.१० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
देशासाठी बलिदान देणाऱ्या, स्वातंत्र्यांनंतर देश उभारणी करणाऱ्या अगणित क्रांतिवीरांना,सीमेवर हुतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून वंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाने केले होते.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.श्री समर्थ पटसंस्थे तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.