चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी Stop Food Wastage या विषयावर पंचक्रोशीतील गावात जाऊन पथनाट्याद्वारे जनजागृती केली. या पथनाट्याच्या माध्यमातून अन्नाची नासाडी थांबावी व अन्नाची बचत व्हावी हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर सचिव माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम प्राचार्य माननीय सौ.अनिता टिळेकर मॅडम व सौ. वर्षा देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. तसेच वर्गशिक्षिका सौ. निकिता हजेरी मॅडम व सौ. राजश्री दातीर मॅडम यांनी पथनाटयासाठी मुलांना मार्गदर्शन केले.