चिंबळी : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मोई (ता. खेड) येथील विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता निमित्त मंगळवारी (दि.२७) पहाटे ४ ते ७ वाजता काकड आरती, सकळी १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान हभप कीर्तन केसरी परमेश्वर महाराज वरकड यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसाद आयोजित करून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व विठ्ठल रूख्मीणी भजनी मंडळ व बांधकाम कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.