चिंबळी फाटा : श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला, कार्यालयाचे उद्घाटन अखिल भारतीय वारकरी संप्रदाय संपर्कप्रमुख माननीय तुकाराम उर्फ बाबांना गवारे, संस्थेचे संस्थापक संभाजीशेठ गवारे, शिवाजीराव गवारे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री कैलासशेठ लिंभोरे, मा. सभापती श्री रामदासशेठ ठाकुर, संचालक श्री अनुराग जैद, पांडुरंग बनकर पीडीसीसी बँक माजी कर्मचारी शंकरराव सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे कार्यक्रमास परिसरातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, दै. सकाळचे पत्रकार गणेशशेठ फलके, विजयशेठ मु-हे,उपस्थित होते, श्री शिवाजी खराबी, अनिल धाडगे संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभासादांमधून हनुमंत कातोरे, कांताराम कड, अनिता पोखरकर, गोरख गवारे, सादिक गवारे, जालिंदर गवारे यांचे वतीने संस्थेस शुभेच्छा देण्यात आल्या, श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या IIT व NET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, कार्यक्रमावेळी संस्थेचे संचालक संतोषशेठ गवारे, सुधीरशेठ मु-हे, उमेशशेठ येळवंडे, सौ. विद्याताई गवारे व सर्व संचालक सल्लागार मंडळ उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ श्री अमोल गवारे यांनी तर सूत्रसंचालन, श्री संतोष गवारे, श्री अर्जुन जाधव, श्री संतोष साकोरे यांनी केले.