सृष्टी उकिरडे हिला मिळाला IIT धारवड , त्याचप्रमाणे अथर्व बेळंबे याला वैद्यकीय शासकीय कॉलेज अकोला , आणि चेतन गायकवाड याला लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे प्रवेश मिळाला
खेड / चाकण . दि १५ सप्टेंबर २०२४ .
खराबवाडी चाकण येथील श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज खराबवाडी येतील कु सृष्टी उकिरडे हिने जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स ( JEE Mains & Advance ) उत्तीर्ण केली आणि आयआयटी धारवाड मध्ये प्रवेश मिळवला .
त्याचप्रमाणे कॉलेजचा विद्यार्थी कु अथर्व बेलांबे आणि कु चेतन गायकवाड या दोन्ही विद्यार्थ्यांनी नीट ( NEET ) या वैद्यकीय परीक्षेत*७२० पैकी ६७० मार्क मिळवत अनुक्रमे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय अकोला व लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे प्रवेश मिळवला .
आज श्री समर्थ पतसंस्था नवीन मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी चिंबळी फाटा येथे श्री समर्थ पतसंस्था व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या वतीने वरील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी श्री समर्थ पतसंस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री संभाजी गवारे , संस्थापक / अध्यक्ष श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर , संस्थेच्या / संस्थापिका सौ विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम , श्री विनोद चौधरी सर , समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गवारे सर , संचालिका ललिता कड , संचालक अंकुश नाणेकर , प्राचार्य अनिता टिळेकर , प्राचार्य सौ विद्या पवार , पर्यवेक्षक सौ अश्विनी देवकर , सौ मोनाली मुंगसे , सौ शोभा तांबे , सौ सपना टाकळकर , सौ अंकिता बोरकर , हसीना मणियार व कॉलेजचे सर्व शिक्षक उपस्थित होते .
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वरील सर्व विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात अग्रगण्य असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवलेला आहे .
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल खेड तालुका व चाकण पंचक्रोशीतून
मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे .