चिंबळी फाटा : श्री समर्थ पतसंस्था चिंबळी फाटा संस्थेस पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन या संस्थेकडून सन 2023-24 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल स्व. शिवाजीराव भोसले उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या ऑफिसमध्ये करण्यात आले सदर पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव गवारे संस्थापक संभाजीशेठ गवारे, संचालक श्री सुधीरशेठ मु-हे संतोषशेठ बनकर सल्लागार हनुमंत कातोरे, सीईओ श्री अमोल गवारे, शाखा व्यवस्थापक श्री अर्जुन जाधव, श्री संतोष साकोरे उपस्थित होते.