चिंबळी फाटा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमय इतिहास समाजात पोहचण्यासाठी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांच्या विचार व मार्गदर्शनातुन श्री समर्थ ग्रुपतर्फे दरवर्षी भव्य किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली जाते, सदर स्पर्धेचे हे ०९ वे वर्ष असुन या ही वर्षी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी 1500 पेक्षा जादा विद्यार्थांना श्री समर्थ ग्रुपतर्फे किल्ले शिवनेरी येथे मोफत सहलीला नेले होते. किल्ले शिवनेरी येथे विवीध शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे, गीते, भाषणे सादर केली, स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यात आले., जिल्हा परिषद शाळा धानोरे येथील विद्यार्थ्यांनी विवीध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे, सचिव सौ विद्याताई गवारे, सल्लागार श्री विठ्ठलदादा ठाकुर, सीईओ श्री अमोल गवारे, प्राचार्या अनिता टिळेकर मॅडम, बस संघटना अध्यक्ष श्री संतोष गवारे त्याचप्रमाणे सर्व शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते, श्री समर्थ स्कूल बस संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना बसचे नियोजन करण्यात आले.