श्री समर्थ ची यशाची परंपरा कायम

कुरुळी ता.5 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने( एच. एस. सी.बोर्ड) फेब्रुवारी व मार्च 2025मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार (ता.05 मे) जाहीर झाला असून चिंबळी फाटा येथील श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीही निकालाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयाचा यंदाचा 12वी चा निकाल 98.48% लागला असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता टिळेकर यांनी दिली. श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा या केंद्रातून एकूण 712 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी चिंबळी फाटा येथील श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयातून एकूण 463 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.पैकी 456 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 3 परीक्षार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. विद्यालयाचा शाखा निहाय एकूण निकाल पुढीलप्रमाणे आहे.

विज्ञान शाखा =98.91%
वाणिज्य शाखा =98.57%
कला शाखा- = 91.30

शाखा निहाय गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे आहे.

विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक – पुजारी अभिषेक संतोष 85%
द्वितीय क्रमांक- जोशी कार्तिक नवीन 83.33%
अवसारे स्नेहल संजय 83.33% तृतीय क्रमांक
म्हसे सार्थक गणेश 82%

वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक – गायकवाड समृद्धी सतीश 76.33%
द्वितीय क्रमांक- मनवार सुबोधिनी नितीन 74%
तृतीय क्रमांक येळवंडे वैष्णवी उमेश 73.33%

कला शाखा
प्रथम क्रमांक – नवघरे आरती विनोद 66%
द्वितीय क्रमांक – संसारे भूमिका पोपट 62.17%
तृतीय क्रमांक- गोसावी सृष्टी वनदास 60.33%

याप्रमाणे शाखा निहाय निकाल लागला असून सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम व प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी अभिनंदन केले आहे .त्यांना मार्गदर्शन करणारे सौ.मोनाली मुंगसे, शोभा तांबे, सपना टाकळकर, निखिल कांबळे, रूपाली पवळे सपकाळ रूपाली ,बडदे ललिता ,डोंगरे नीलम , शिवानी शिंदे , ,खालोकर सुनेत्रा ,जोशना नागणे ,दिपाली थोरात, अजित थोरात, सिद्धेश धोंडगे, इंगळे गजानन केदार अनिल, सुहासिनी तायडे, राजश्री शिंदे, विशाल डोळस ,रैनक जयश्री, सावंत विद्या, अनिता लंके यांनी मार्गदर्शन केले.श्री समर्थ बस संघटना व श्री समर्थ पतसंस्था यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

news portal development company in india
marketmystique