श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे नवरात्रीनिमित्त नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे नवरात्रीनिमित्त नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन

शनिवार दि.१७ ऑक्टोंबर २०२६ रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच आपल्या कर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कार प्राप्त केलेल्या नवदुर्गांची नावे
शिक्षण क्षेत्र – सौ. लिलाबाई संभाजी कोळेकर
आरोग्य सेवा – डॉ. सौ. ज्योती संपत जाधव
स्वयंरोजगार – सौ. शांताबाई साहेबराव बेंडाले
कला व संस्कृती – कु. ऋतुजा सुनील आंद्रे
क्रीडा क्षेत्र – कु. अपेक्षा हनुमंत येळवंडे
उद्योजिका – सौ. शैला काळुराम बेंडाले
कृषी व शेती पूरक व्यवसाय – सौ. जनाबाई चंद्रकांत कान्हूरकर
विशेष प्रेरणादायी कार्य – उषा प्रकाश पाडेकर
प्रशासन व सार्वजनिक कार्य – सौ . अश्विनी प्रणय येळवंडे
वरील सर्व नवदुर्गांच्या विविध क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान म्हणजे आमच्या जबाबदारीची जाणीव आणखी वाढवणारा आहे अशी भावना पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजी बबनराव गवारे सर, संस्थेच्या सचिव तथा संचालिका मा.सौ. विद्याताई गवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सौ. नंदाताई उमेशशेठ येळवंडे, प्राचार्य सौ. पल्लवी कुटे मॅडम, उपप्राचार्य सौ. ज्योती येळवंडे मॅडम, तसेच सौ. साधना आल्हाट मॅडम आणि को- ऑर्डिनेटर सौ. प्रियंका येळवंडे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी रास दांडिया चा आनंद घेतला यावेळी पालकांमध्ये सर्वोत्कृष्ट पारंपारिक पोशाख व गरबा क्वीन पुरस्कार देण्यात आला अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

news portal development company in india
Recent Posts