श्री समर्थ पतसंस्थेच्या ९ व्या सासवड शाखेचे शुभारंभ उत्साहात
सासवड : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा या संस्थेच्या नवव्या सासवड शाखेचा शुभारंभ गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ संभाजीशेठ गवारी, संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारी, खजिनदार संतोषशेठ गवारी यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे संचालक सल्लागार व मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्यास माजी नगरसेवक सुहास बापू लांडगे, पंचायत समिती सदस्य अर्चनाताई कटके, सायलीताई शिंदे, आडाचीवाडीच्या सरपंच सुवर्णाताई पवार, तसेच संस्थेचे स्थानिक संचालक अविनाश खळदकर, नितीन फुले, श्रीकांत जगताप, विवेक दाते, ॲड. संजय अकोलकर, त्रिकाल दिघे, सोमनाथ लोहकरे, दत्तात्रय कदम, तुषार झुरुंगे, प्रकाश झेंडे, स्वप्निल चवरे, तानाजी मेमाणे, मेघाताई मेमाणे, धर्मराज कुदळे, दर्शन पवार, ॲड. लता चौंडकर, तेजस कामठे, प्रमोद खळदकर आणि ॲड. बिपीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, सभासद, ठेवीदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच म्हाडाचे माजी उपाध्यक्ष श्री. विजयदादा कोलते, जिल्हा परिषद सदस्या कु. प्राजक्ताताई दुर्गाडे, श्री. हरिभाऊ लोळे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती श्री. अमितदादा झेंडे, सहाय्यक निबंधक श्रीमती यशवंती मेश्राम आणि जेजुरी नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. शिवाजीराजे जगताप आदी मान्यवरांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारी यांनी श्री समर्थ पतसंस्थेच्या आजवरच्या आर्थिक वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा मांडला. ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि तत्पर सेवा यांच्या बळावर संस्थेने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रात संस्थेने विस्तार केला असून, सासवड शाखेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील नागरिकांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सीईओ श्री. अमोल गवारे यांनी केले. सूत्रसंचालन जालिंदर काळे व अर्जुन जाधव यांनी केले, तर उपस्थित सभासद, बंधू-भगिनी आणि मान्यवरांचे आभार संस्थेचे सल्लागार हनुमंत कातोरे, ज्ञानेश्वर ठाकुर व शाखाधिकारी नागेश सपकाळ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.






