जागर स्त्री शक्तीचा श्री समर्थ पतसंस्था सोमाटणे फाटा शाखेत नवरात्रोत्सवानिमित्त ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रम उत्साहात; विविध खेळांचे आयोजनआयोजन
सोमाटणे फाटा :
येथील श्री समर्थ पतसंस्था, सोमाटणे फाटा शाखेच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ आणि विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नवरात्रीच्या पवित्र पर्वावर आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे ४५ ते ५० महिला उपस्थित होत्या. पारंपरिक पद्धतीने एकमेकींना हळदी-कुंकू लावून आणि वाण देऊन सणाचा आनंद साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिलांसाठी विविध मनोरंजक व कौशल्यावर आधारित खेळ (Games) घेण्यात आले. या खेळांमध्ये सर्वच महिलांनी अत्यंत उत्साहाने आणि हिररीने भाग घेतला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेला लकी ड्रॉ. या लकी ड्रॉ मधून ३ भाग्यवान विजेत्यांचे नंबर काढण्यात आले आणि त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित महिलांना संस्थेच्या वतीने आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात आले. यामध्ये श्री समर्थ पतसंस्थेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजना, दैनंदिन बचत आणि महिलांसाठी असलेल्या विशेष योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या यशस्वी उपक्रमाबद्दल परिसरातील महिलांनी संस्थेचे विशेष आभार मानले.






