श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.

शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सकाळी ६:३० वाजता शाळेचा प्रांगणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजारोहणाची सर्व तयारी केली होती कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून करण्यात आली प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शाळेतील ध्वजारोहण श्री दत्तात्रय कान्हुरकर यांच्या हस्ते झाले .मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. लहान गटातील मुलांनी नाटकाचे माध्यमातून आपल्या राष्ट्राची प्रतीके समजावून सांगितली तसेच पहिली ते चौथीच्या मुलांनी कवायत सादर केली.
22 एप्रिल 2025 रोजी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशती हल्ल्यावर त्यांना देण्यात आलेले उत्तर “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेचा माध्यमातून भारताच्या लष्कराने पाकिस्तानाला कसं पाणी पाजलं हे श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे विद्यार्थिनींनी पथनाट्यातून सगळ्यांना धमकावून सांगितलं की जगाच्या पाठीवर असे कोणते कार्य नाही जे स्त्रिया करू शकत नाही. स्व.
श्री अण्णासाहेब फलके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळेमध्ये पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना श्री समर्थ पतसंस्थेकडून बक्षीस वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी श्री युवराज शिंदे , श्री कैलास येळवंडे, श्री धर्माजी आंद्रे ,श्री निलेश आंद्रे, संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे सर, संस्थापिका सौ विद्याताई गवारे मॅम, श्री समीर गवारे सर,प्राचार्या सो पल्लवी कुटे मॅम, उपप्राचार्य सौ ज्योती येळवंडे मॅम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालक वर्गांमधून श्री अखिलेश राय या पालकांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आले.

news portal development company in india