पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन तसेच स्व. आमदार शिवाजीराव भोसले प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला संचालिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था, चिंबळी फाटा येथील विद्यमान संचालिका सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांना “उत्कृष्ट महिला संचालिका” या विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान आणि महिलांना प्रेरणा देणारे नेतृत्व याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे संस्थेचा व परिसराचा गौरव वाढला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





