चाकण : ता. ८
राज्यस्तरीय “शिक्षण संजीवनी” या मासिकाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव आणि प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन असा बहुविध कार्यक्रम रविवारी ८ मार्च २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता .
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.साहित्य, शिक्षण आणि संस्कृती यांचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
समर्थ शिक्षण संस्था चिंबळी फाटा संस्थेच्या खराबवाडी चाकण समर्थ महाविद्यालय येथे कार्यरत असणाऱ्या प्रा. अर्चना पोखरकर यांचा “विशेष सन्मान” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम पुणे येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता, येथे संपन्न झाला.“शिक्षण संजीवनी” या राज्यस्तरीय मासिकाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजासमोर आदर्श उभा करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलादेवी आवटे (सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे) या उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर महिला स्मिता कुलकर्णी (उपाध्यक्ष, महर्षी कर्वे शिक्षण संस्था, पुणे), डॉ. राजश्री जायभाये (अकॅडमीक कौन्सिल मेंबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ) , प्रा. मीता चौधरी (संचालक, राजपथ अकॅडमी व प्रकाशन, पुणे), कल्पना गवरे (आयोजक, अक्षरविश्व साहित्य संमेलन, लंडन) , चंद्रलेखा बेलसरे (ज्येष्ठ साहित्यिका व उद्योजिका) या कर्तृत्ववान महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या .
या कार्यक्रमात शिक्षण संजीवनी आयोजीत राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत यशस्वी झालेल्या कवी-कवयित्रींचा सन्मान करण्यात आला तसेच परभणी येथील कवी मारोती कदम लिखित प्रतिनिधिक काव्यसंग्रह महाएल्गारचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांना समाजासमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सादर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला . पुरस्कार प्राप्त कर्तृत्ववान महिला म्हणून पुढील महिलांचा सन्मान करण्यात आला.विजया चतुर, सुरेश लिलके, दिपाली पवार, अपर्णा पाटील, स्मिता कल्याणकर, दिपाली शेडगे, जयमाला चव्हाण, संपदा देशमुख, मनिषा शिरटावले, प्रिया ढमाळ, अर्चना पोखरकर, श्रीम. सुनिता राणे, जयश्री थोरात, सुप्रिया नवले, सुनिता उभे, श्रीमती शोभा माने, सुनंदा जाधव, वंदना घोडके, अनिता दाणे, आशाकला कोवे, प्रणिता लवटे, मेघना भोसले, संजीवनी खैरमोडे, निता अरसुळे, लता पाटील, आम्रपाली मादळे / कदम, अनुराधा माने, वृषाली घोरपडे, रंजना पवार, योगिता कोठेकर, शामला पंडित (दिक्षीत), प्रतिमा काळे, वैशाली चव्हाण, लता पाटील, कु. सृष्टी जगताप, गौरी मधुकर शेंडे , नसीमा इनामदार, मीना म्हसे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजन “शिक्षण संजीवनी मासिक परिवार, पुणे” यांच्यावतीने करण्यात आले होते . कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय जगताप (कार्यकारी संपादक, शिक्षण संजीवनी मासिक) आणि देविदास लिमजे (संपादक, शिक्षण संजीवनी मासिक) हे होते. सूत्रसंचालन सुनीता काटम यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सतीश सातपुते, दत्तात्रय उभे, विद्याधर चव्हाण, महावीर जाधव, उज्वला जगताप, स्नेहा खडसे आणि देवयानी वैदनकर हे होते.
महिला सक्षमीकरण, साहित्य संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव या तिहेरी उद्दिष्टाने आयोजित हा कार्यक्रम साहित्यप्रेमी, शिक्षक आणि कवींसाठी प्रेरणादायी ठरला.
या पुरस्काराबद्दल समर्थ शिक्षण संस्था चिंबळी अध्यक्ष शिवाजीराव गवारे, उपाध्यक्ष सौ.विद्या गवारे, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी प्रा. पोखरकर यांचे अभिनंदन केले.






