खराबवाडी येथील श्री समर्थ स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या जयघोषात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विद्यालय परिसर देशभक्तीपर गाणी, तिरंगी झेंडे व फुलांच्या सजावटीने नटलेला दिसत होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरी , स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे संचालन यांनी झाली . मुख्य पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले . राष्ट्रगीताच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे आधारवड श्री बबनराव गवारे , सौ सुमनताई गवारे , श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / अध्यक्ष मा श्री शिवाजीराव बबनराव गवारे , सचिव सौ विद्याताई शिवाजीराव गवारे , श्री समर्थ पतसंस्थेचे सर्व संचालक श्री रमेश लोणारी , अंकुशशेठ नाणेकर , सागर सोमवंशी , विठ्ठल कड , दत्तात्रय नाणेकर , राजूशेठ कड , अनिलशेठ कड , संतोष देवकर , विद्यालयाच्या प्राचार्य सौ विद्या पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी देवकर , सर्व पर्यवेक्षक अंकिता बोरकर , हसीना मणियार , दिगंबर कुलकर्णी , अर्चना पोखरकर , आरती क्षीरसागर , तेजश्री बंडगर , अजय स्वामी व सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शेकडो विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकून गेले. देशभक्तिपर नृत्य, गीत, भाषणे, लघुनाटिका यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले. “स्वातंत्र्य सेनानींचा संघर्ष व आजची तरुण पिढी” या विषयावर झालेल्या प्रभावी भाषण व “भारतीय सैन्याने केलेले ऑपरेशन सिंदूर पथनाट्यमुळे विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश दिला.
श्री समर्थ पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त पाढे पाठांतरस्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना श्री समर्थ ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था यांच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करणारा हा क्षण ठरला.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य संग्रामातील शौर्यकथा, महापुरुषांचे योगदान आणि आजच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी यांचा उल्लेख केला. “देशासाठी आपले कर्तव्य पार पाडणे हीच खरी देशभक्ती आहे” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्तीची अमिट छाप सोडून गेला.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पोखरकर , साची ओसवाल , सोनाली कासवा यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या प्राचार्य सौ विद्या पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली .






