श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे पथनाट्य माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला मोलाचा संदेश

शुक्रवार दि.१९/०९/२५

  1. श्री समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती करण्यासाठी तसेच आजच्या काळात माणुसकी विसरत चाललेल्या लोकांच्या मनात इतरांविषयी भावनिकता निर्माण करण्यासाठी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी माणुसकी चोरीला गेली हा विषय पथनाट्यातून सादर केला.

माणुसकी म्हणजे माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे, वेळेला मदत करणे हीच अपेक्षा असते.

हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना… ही प्रार्थना आपण लहान असताना शाळेत शिकलो पण त्या कवितेतून मिळालेला बोध आपल्याला आजपर्यंत घेता आला नाही म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांनी माणुसकी ही पथनाट्यातून समजावून सांगितलेली आहे.

तसेच लहान गटातील विद्यार्थ्यांनी आजच्या या कलयुगात आहार आणि आरोग्याकडे लोकांचे होणारे दुर्लक्ष, त्यापासून होणारे नुकसान समजावून सांगण्यासाठी ‘आहार आणि आरोग्य’ हा विषय मांडत आहाराचे‌ महत्त्व पटवून दिले.आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे हे पटवून सांगताना विद्यार्थ्यांनी आहारामध्ये कडधान्ये, फळभाज्या,फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा ‌हे सांगितले.

हा उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री. शिवाजीराव गवारे सर, अध्यक्षा सौ. विद्याताई गवारे मॅम, प्राचार्य सौ.पल्लवी कुटे मॅम आणि उपप्राचार्य सौ.ज्योती येळवंडे मॅम त्याचप्रमाणे शिक्षकवृंद सौ.सारीका येळवंडे मॅम,सौ. ज्ञानेश्वरी मॅम, सौ. दिपाली मॅम,सौ.अश्विनी मॅम,सौ.प्रतिक्षा मॅम यांनी मार्गदर्शन केले.

news portal development company in india