कल्याणी तरस हिला विभागीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

चिंबळी फाटा – श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. कल्याणी अमोल तरस हिने विभागस्तरीय शालेय नेमबाजी (Shooting) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. तिच्या या यशामुळे तिला आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर, सचिव मा. सौ. विद्याताई गवारे मॅडम, तसेच प्राचार्य सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी कु. कल्याणी हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही तिच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

संस्थेचे अध्यक्ष श्री. गवारे सर म्हणाले, “कल्याणीने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. राज्यस्तरावरही ती निश्चित यश संपादन करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

विजयी भव कल्याणी!

news portal development company in india