रविवार दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी श्री. समर्थ ग्रुप संचलित गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या वाळकी, ता. नगर, जि. अहिल्यानगर शाखेचा उद्घाटन सोहळा संस्थेचे संस्थापक/आधारस्तंभ श्री.संभाजीशेठ गवारी व संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खजिनदार संतोष गवारे, श्री.समर्थ स्कुल अँड कॉलेजच्या सचिव सौ.विद्याताई गवारी, जि. प. सदस्य अ. नगरचे माजी सभापती श्री. बाळासाहेब हरळ, वाळकी गावचे सरपंच श्री.शरद बोठे पाटील, पं. स. मा. उपसभापती श्री.रंगनाथ निमसे ,भा.ज.प. जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, वि.का.सोसा. चेअरमन श्री. सोपानकाका कासार, उपसरपंच दादासाहेब कासार, एन.डी.कासार कॉलेजचे सचिव श्री.विक्रम कासार, वि.का.सोसा. व्हाईस चेअरमन श्री.अमृत काटकर, श्री.सुरेश भालसिंग, श्री. सावळेराम भालसिंग, नामदेव आढाव, पंडित अप्पा बोठे, अरुण बोठे, नामदेव बोठे, राजेंद्र दळवी, कांडेकर सर, राम मेजर भालसिंग, अप्पा भालसिंग, बापू वाघ, ज्ञानदेव गोरे, बाळासाहेब कासार, राजेंद्र खेडकर, मच्छिंद्र लाड, संजय भालसिंग, राजेंद्र तांबे, संजय तांबे संचालक रामकृष्ण पुंडे, तानाजी फलके, लोखंडे सर, कार्यकारी सल्लागार ज्ञानेश्वर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते, सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे वाळकी शाखेचे संचालक श्री संतोष हारदे व इतर संचालक सल्लागार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. संदीप भालसिंग सर यांनी केले तर प्रास्ताविक व श्री समर्थ ग्रुपची माहिती श्री. समर्थ पतसंस्थेचे सीईओ श्री. अमोल गवारे यांनी दिली. संस्थेचे चेअरमन श्री.शिवाजीराव गवारे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री.समर्थ पतसंस्था व गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कार्यपद्धती बद्दल माहिती दिली. उपस्थित सर्व मान्यवर सभासद, हितचिंतक यांचे आभार संस्थेचे एम. डी. श्री. शरद काकडे व विभागीय अधिकारी श्री अर्जुन जाधव यांनी मानले.






