चिंबळी फाटा : श्री समर्थ ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या निमित्ताने भव्य “किल्ले बनवा स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व आकर्षक किल्ले साकारले. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे १० वे वर्ष आहे.
या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांच्या सहभागाचा गौरव म्हणून श्री समर्थ ग्रुपतर्फे दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सहल सुरळीत पार पडावी यासाठी संपूर्ण तालुक्यातील विविध भागांतून बसची सोय करण्यात आली असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी या मोफत सहलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांनी केले आहे.






