भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा परिसर राष्ट्रप्रेम, एकता आणि अभिमानाच्या भावनेने भारावून गेला होता.
विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच देशभक्तीपर गीत व प्रभातफेरीने झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री समर्थ पतसंस्थेचे सर्व संचालक व सल्लागार मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योजक श्री अनिलशेठ कड यांनी भूषवले. तसेच समर्थ पतसंस्थेचे सल्लागार मा श्री दत्तात्रय नाणेकर , संचालक सागर सोमवंशी , उद्योजक राजू कड या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण 🇮🇳 करण्यात आले.
ध्वजारोहणावेळी सर्वांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले आणि परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमून गेला.
. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत देशभक्तीपर घोषणा दिल्या. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती, व्यायामप्रकार आणि संचलन सादर करून आपली शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावना यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे पार पडली . विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व , भारताची प्रगती , सामाजिक एकता आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याबाबत आपले विचार प्रभावी शब्दांत मांडले.
यावेळी विशेष आकर्षण ठरला तो राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणारा इयत्ता आठवी सेमीचा विद्यार्थी ओमसाई गडबडे याचा सन्मान. आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्यामुळे राज्यस्तरावर विचारमंच गाजवणाऱ्या या विद्यार्थ्याला कार्यक्रमात सन्मानचिन्ह , शाल आणि घड्याळ देऊन गौरविण्यात आले. त्याच्या यशामुळे संपूर्ण शाळेचा अभिमान उंचावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक अर्चना पोखरकर, शिक्षिका साची ओसवाल व सोनल शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे औपचारिक आभार प्रदर्शन अंकिता बोरकर यांनी करून सर्वांचे ऋण व्यक्त केले.
या यशस्वी कार्यक्रम प्राचार्य विद्या पवार , COO अश्विनी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .
प्रत्येक शिक्षकाने आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत मनोभावे पार पाडल्या. . त्यांच्या परिश्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. देशप्रेम , संविधानाबद्दल आदर, शिस्त आणि एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.






