मोई ग्रामपंचायतीकडून बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन

चिंबळी फाटा (प्रतिनिधी):
समस्त मोई गावातील नागरिकांची सेवा, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा यासाठी मोई ग्रामपंचायतीच्या वतीने बस सेवा सुरू करण्याबाबत आज लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावेळी मोई गावचे उपसरपंच श्री. सोमनाथभाऊ गवारी, उद्योगपती श्री. संभाजीशेठ गवारी, उद्योगपती श्री. संतोषशेठ गवारे व एलआयसी विमा प्रतिनिधी श्री. संतोष येळवंडे उपस्थित होते. यावेळी पीएमपीएमएलचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. मनोज हिंगे यांना सदर निवेदन देण्यात आले.
मोई गाव व परिसरातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी वाहतुकीची अपुरी सुविधा आहे. त्यामुळे तातडीने बस सेवा सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

news portal development company in india