“श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथील विद्यार्थ्यांनची गणेशोत्सवानिमित्त केळगाव येथील आपुलकी वृद्धाश्रमास भेट”

बुधवार दिनांक ०३/०९/२०२५ या रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे राबविण्यात आलेल्या “मातृ-पितृ देवो भव” या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे आपल्या आयुष्यात असणारे स्थान दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांना केळगाव येथील वृद्धाश्रमास भेट देण्यासाठी नेण्यात आले होते.
‌‌ आपुलकी वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भेटून तेथील आजी-आजोबा आनंदी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतःच्या नातवंडांना पाहत होती. तेथील आजी-आजोबांचे विविध खेळ घेण्यात आले होते. या खेळामध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.आपुलकी वृद्धाश्रम ही संस्था केळगाव येथे असून तिचे कामकाज श्री.भगवत महाराज बोऱ्हाडे हे पाहतात. ते संस्थेतील आजी-आजोबांची आपल्या आई-वडिलांप्रमाणे काळजी घेतात .ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मातृ-पितृ देव म्हणजेच आई वडिलांचे स्थान आपल्या आयुष्यात सर्वोच्च आहे ते आपल्याला शिक्षण देऊन मोठे करत आपले कर्तव्य बजावतात तर आपण त्यांना त्यांच्या वृद्धापकाळी सांभाळून आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. वृद्धाश्रमास शाळेकडून ब्लॅंकेट आणि धान्यवाटप करण्यात आले. वृद्धाश्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे महत्त्व समजावून देण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. गणेश वाजे सर, सौ. सारिका येळवंडे मॅम, सौ. प्रीती वामन मॅम उपस्थित होत. विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे संस्थापक श्री. शिवाजीराव गवारे सर ,अध्यक्षा सौ. विद्याताई गवारे मॅम, प्राचार्य सौ पल्लवी कुटे मॅम आणि उपप्राचार्य सो ज्योती येळवंडे मॅम यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आभार मानले.

news portal development company in india