राजगुरूनगर ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न; 16 कर्तृत्ववान महिलांचा गौरव
संघर्ष, जिद्द आणि सेवाभावातून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या नारीशक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सन्मानाची मानवंदना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे जिल्हा संपर्क विभागाच्या वतीने रविवार , दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी देशपांडे वाडा राजगुरूनगर येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळा 2026’ रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, संघर्ष आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चाकण,राजगुरूनगर, शिरूर, शिक्रापूर परिसरातील 16 कर्तृत्ववान महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात वरील चार तालुक्याती मातृशक्ती उपस्थित होत्या त्यात रुपाली विकास पवळे ( शैक्षणिक क्षेत्र ), मेधा नितीन राक्षे ( शैक्षणिक क्षेत्र ), जयश्री द्वारकादास बैरागी, कृष्णाबाई विठ्ठल कारले( बचत गट), कविता मंगेश पाटील ( अडचणीतून व्यवसाय निर्मिती ), वर्षा विठ्ठल गुट्टे ( क्रीडा क्षेत्र), सुवर्ण जीवन करपे ( ग्राम सखी ), निकिता प्रताटराव खांडेभराड ( शिक्षण क्षेत्रात काम ), राणीताई चौरे ( मतिमंद मुलांमध्ये काम ), वैशाली चव्हाण ( घरच्या महिलांचे आर्थिक उन्नती ), शितल शशिकांत नाणेकर ( हिंदू महिलांमध्ये जागृती ), निशा धर्मनाथ धुमाळ ( महिला सुरक्षा आणि सन्मान संयोजिका ), नीता सुशील शेवकरी ( सामाजिक क्षेत्रात योगदान ), सुषमा शांताराम शिंदे ( पत्रकार व सेंद्रिय शेती ), शिवांजली वसंत फडतरे, मनीषा सुभाष धुमाळ, अश्विनी नरेंद्र धर्माधिकारी ( धार्मिक क्षेत्रात काम ) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सौ. विजूला नरेंद्र पेंडसे, शिक्षण- एम ए अर्थशास्त्र, एम ए मानसशास्त्र, डिप्लोमा इन काउंसिलिंग सायकॉलॉजी, डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी यांचे मार्गदर्शन झाले. सौ पेंडसे यांनी सशक्त महिला या घराचा आधार आहेत तसेच महिलांनी पुढे येऊन समाजामध्ये हिरेरीने काम केले पाहिजे, आपले घर सांभाळत असताना समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजामध्ये काम केले पाहिजे, त्यांनी सन्मानार्थि महिलांचे अभिनंदन केले व त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या. अशा कार्यशील नारीशक्तीच्या पाठीशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सदैव उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय चाकण तालुका संपर्क प्रमुख श्री शिवाजीराव गवारे यांनी केले. अथर्व जोशी व मृणाल जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन श्री. संपतराव कैदरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शिक्रापूर तालुक्याचे माननीय संघचालक श्री देवेंद्र कोळपकर व श्री अजित घमंडे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते.
समाजातील सामान्य परिस्थितीतून असामान्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन, सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रेरणादायी संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
जय श्रीराम






