*नेहरूनगर येथे संपन्न झालेल्या उडान 4.0 आंतरशालेय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत श्री समर्थ च्या विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक….*
*चिंबळी फाटा :* दिनांक २४/१०/२०२६, वार: शनिवार रोजी नेहरूनगर येथे आचार्य अत्रे सभागृहात झालेल्या *उडान 4.0* आंतरशालेय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल चिंबळी फाटा या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संघाने घवघवीत यश संपादन केले आणि द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सेलिब्रिटी माननीय श्री वैभव घुगे सर व माननीय श्री दीपक हुलसुरे सर हे उपस्थित होते. *उडान 4.0* या स्पर्धेचे नियोजन *माननीय श्री. रोहित कदम सर* यांनी केले होते.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक श्री रोहित कदम सर व मार्गदर्शक शिक्षक श्री सौरभ शुक्ला सर व विजेत्या मुलांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर, सचिव माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम, विद्यालयाच्या प्राचार्या माननीय सौ. अनिता टिळेकर मॅडम सर्व शिक्षक वृंद, पालक, तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.






