*गोरेश्वर मल्टीस्टेटच्या वाळकी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात; सभासदांसाठी मोफत वाचनालयाचे उद्घाटन*
वाळकी : श्री समर्थ ग्रुप संचलित गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेटच्या वाळकी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सभासदांसाठी मोफत वाचनालय व ग्रंथालय सुरू करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री. संभाजीशेठ गवारी, संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी, संचालक श्री. संतोषशेठ हारदे यांच्या हस्ते करण्यात आले.
सभासदांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृती रुजावी, ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी तसेच सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, ज्ञान आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा श्री समर्थ ग्रुपचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
या कार्यक्रमास बाळासाहेब हराळ, विक्रम कासार, सोपान कासार, अमृत काटकर, संतोष भालसिंग, राम भालसिंग, उदय बोठे, इंद्रजीत बोठे, विठ्ठल सुपेकर, विजय कासार, शिवाजी लोखंडे, संभाजी कासार, आशिष कासार, किरण कांडेकर, अंकुश लव्हाळे, संस्थेचे लेखापरीक्षक श्री. अभिजीत काळे, कार्यकारी सल्लागार श्री. ज्ञानेश्वर ठाकूर, श्री. किसन देशमुख, श्री. हरिदास वाडेकर, श्री. दिनेश सरोदे, श्री. दुर्योधन कांबळे तसेच शाखेचे सर्व संचालक व सल्लागार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शरद काकडे व श्री. अर्जुन जाधव यांनी केले, तर आभार सल्लागार श्री. हनुमंत कातोरे व श्री. अमोल गवारे यांनी मानले.






