या अभिनव उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) माननीय श्री. गजानन पाटील साहेब, शिक्षणाधिकारी श्री .संजय नाईकडे साहेब , माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री . भाऊसाहेब कारेकर साहेब , योजना शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर मॅडम, माजी उपशिक्षणाधिकारी श्री. सिद्धार्थ चव्हाण साहेब, ओपन लिंक्स फाउंडेशनचे श्री . संजय दालमिया – पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांशी आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी संवाद साधला. शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या जिल्ह्यातील 54 शिक्षकांचा या विशेष सत्रात गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश, जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या समोरच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती जिल्हाभर पसरवून इतर शिक्षकांनाही प्रेरणा देणे हा होता. मा. सी.ई.ओ. साहेबांनी शिक्षकांसोबत अनौपचारिक वातावरणात संवाद साधत, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षकांनी डिजिटल साधने, ऑनलाइन शिक्षण पद्धती आणि स्मार्ट क्लासरूमच्या वापर






