गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेट पतसंस्थेचे वासुली फाटा शाखेचे उद्घाटन उत्साहात

भांबोली : गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेट पतसंस्था (श्री समर्थ ग्रुप संचलित) यांच्या वासुली फाटा शाखेचे उद्घाटन तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. बाबाजीशेठ काळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री संभाजीशेठ गवारे, संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे, उपाध्यक्षा सौ. सुरेखाताई गवारे तसेच खजिनदार संतोषशेठ गवारे उपस्थित होते.

उद्घाटन समारंभास प्रमुख उपस्थितीमध्ये खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती कैलास गाळव, विद्यमान सदस्य अनुराग जैद, श्री बबनराव गवारे तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि विविध सोसायट्यांचे चेअरमन उपस्थित होते.

मोई सोसायटीचे चेअरमन व मल्टिस्टेटचे खजिनदार श्री सादिक गवारे, संस्थेच्या संचालक सल्लागार मंडळातील श्री सर्जेराव गवारे, श्री भगवान साकोरे, श्री दत्तात्रय नाणेकर, श्री हनुमंत कातोरे, श्री बाळासाहेब येळवंडे, ॲड. राहुल बोत्रे, श्री भानुदास गाडे, श्री अजय फडके, श्री उमेश येळवंडे, श्री ज्ञानेश्वर ठाकूर, श्री शेखर करपे, ॲड. मनोहर जंबूकर, श्री काळुराम बनकर, श्री संतोष बनकर, श्री दिनेश सरोदे, श्री संतोष गवारे, श्री बाबुराव गवारे, श्री विकास मांडे, श्री भारत सातपुते, श्री अभिजीत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे वासुली फाटा शाखेच्या संचालक सल्लागार मंडळातील श्री कैलास पडवळ, श्री दिगंबर ठोंबरे, श्री प्रकाश लिंभोरे, श्री शिवाजी कावरे, श्री मालक पाचपुते, श्री किसन पिंजण, श्री मारुती पानमंद, श्री मोहन कोळेकर, श्री देविदास देशमुख, श्री संतोष कावडे, श्री दादाभाऊ भोसले, श्री निवृत्ती नवले, श्री ज्ञानेश्वर साळुंके, श्री बळीराम मराठे, श्री ज्ञानेश्वर कोळेकर, श्री कैलास नवले, श्री सागर निखाडे, श्री बाजीराव शेटे, श्री प्रकाश गावडे, श्री गुलाब शिवेकर, श्री विजय केंदळे, श्री सागर नाटक, श्री संतोष कोळेकर, श्री हौशीराम सातपुते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन देशमुख, सीईओ श्री गवारे, विभागीय अधिकारी अर्जुन जाधव व शाखा व्यवस्थापक श्री गणेश कदम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांनी मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

news portal development company in india