श्री समर्थ पतसंस्था निघोजे शाखेच्या नवीन कार्यालयाचे व लॉकर सेवेचे उत्साहात उद्घाटन

श्री समर्थ पतसंस्था निघोजे शाखेच्या नवीन कार्यालयाचे व लॉकर सेवेचे उत्साहात उद्घाटन

निघोजे : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या निघोजे शाखेच्या नवीन प्रशस्त कार्यालयाचे तसेच अत्याधुनिक लॉकर सेवेचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, पंचायत समिती खेडच्या सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, सदस्या रुपाली कांबळे, गौरी मुऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रणजित गाडे, सदस्य अनुराग जैद, सागर मुऱ्हे, सरपंच सुनिता येळवंडे, उपसरपंच दीपक कांबळे, सोसायटीचे चेअरमन जितेंद्र आल्हाट, तसेच निघोजे गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाखेचे संचालक व सल्लागार मंडळाचे सदस्य नंदकुमार बेंडाले, कैलास येळवंडे, उमेश येळवंडे, आप्पासाहेब पाडेकर, संदीप येळवंडे, अजय फडके, बाळासाहेब येळवंडे, कुलदीप येळवंडे, प्रकाश जामदार, कांचन शिंदे, सोपान आल्हाट तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे संचालक व सल्लागार मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाखेची स्थापना दि. २८ जुलै २०१९ रोजी झाली असून शाखेने यशस्वी ७ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या कालावधीत शाखेने १७ कोटी रुपयांच्या ठेवी, १३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करत एकूण ३० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे. पंचक्रोशीतील सभासद व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या प्रसंगी लॉकर सेवेचाही शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे सदस्य तुकाराम (बाबा अण्णा) गवारी, माजी उपसरपंच हिरामण येळवंडे, कामगार नेते दत्तात्रय येळवंडे, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, समाजभूषण शंकर नाना येळवंडे तसेच सरपंच सुनिता येळवंडे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे आमदार बाबाजी काळे व पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते यांनी श्री समर्थ पतसंस्थेच्या ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक विकासासाठीच्या योगदानाचे कौतुक करून संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीचा व शाखेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा उपस्थित सभासदांसमोर मांडला. संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे यांनी नागरिकांनी संस्थेच्या विविध बचत, कर्ज व लॉकर सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गवारे यांनी केले. सूत्रसंचालन किसन देशमुख यांनी केले, तर उपस्थित मान्यवर, सभासद व नागरिकांचे आभार सल्लागार हनुमंत कातोरे यांनी मानले.

news portal development company in india
soical Sharing