मोदक बनवा, रांगोळी व चित्रकला स्पर्धेत पालकांनी दाखवली सर्जनशीलता
खालुंब्रे : श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, खालुंब्रे यांच्या वतीने आयोजित “गणेश सर्जन महोत्सव २०२६” अंतर्गत पालकांसाठी विविध सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी मोदक बनवा, रांगोळी आणि चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आपल्या दैनंदिन व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पालकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांना सुंदर व्यासपीठ मिळवून दिले.
या स्पर्धेचे नियोजन सुरज सोमवंशी सर यांनी केले. त्यांना मुख्याध्यापिका सौ. पूजा पतंगे व हेड मेंबर सौ. स्नेहल नाटक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच Cultural Department मधील सौ. शीतल पवार व सौ. स्नेहल जयसिंगपुरे यांनी स्पर्धांचे उत्तम नियोजन व आयोजन करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.
स्पर्धेतील विजेते
मोदक बनवा स्पर्धा
प्रथम क्रमांक – सौ. अमृता सचिन माने
द्वितीय क्रमांक – सौ. अश्विनी सचिन गाडगे
तृतीय क्रमांक – सौ. माधुरी चंद्रकांत नरवडे
चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक – सौ. अश्विनी सचिन गाडगे
रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक – सौ. करिष्मा गजानन बावनथडे
स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या पालकांना बक्षीस व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, “अशा स्पर्धांमध्ये केवळ बक्षीस किंवा पैसा महत्त्वाचा नसतो, तर सहभागी होण्याची जिद्द, उत्साह, सर्जनशीलता आणि स्वतःसाठी वेळ देण्याची तयारी हीच खरी कमाई असते.”
पालकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा शाळेसाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि कलागुणांना वाव देणारे उपक्रम आयोजित करण्यात येतील, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
सर्व विजेते तसेच सहभागी पालकांचे श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, खालुंब्रे परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार!





