खालुंब्रे : श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, खालुंब्रे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी Drawing Competition चे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
चित्र काढताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला सुंदर रंगांची जोड देत विविध आकर्षक कलाकृती साकारल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
स्पर्धेचे विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार चार गट करण्यात आले होते.
🏆 स्पर्धेतील विजेते
🌼 KG Section Group
🥇 प्रथम क्रमांक – Nishtha Butale
🥈 द्वितीय क्रमांक – Neel Botre
🥉 तृतीय क्रमांक – Shlok Patil
🌼 1st to 3rd Std Group
🥇 प्रथम क्रमांक – Nikhil Kumar
🥈 द्वितीय क्रमांक – Rudrashree Kapase
🥉 तृतीय क्रमांक – Shiv Botre
🌼 4th to 6th Std Group
🥇 प्रथम क्रमांक – Prathamesh Shelar
🥈 द्वितीय क्रमांक – Akshar Kumar
🥉 तृतीय क्रमांक – Om Mali
🌼 7th to 10th Std Group
🥇 प्रथम क्रमांक – Nikhil Choudhary
🥈 द्वितीय क्रमांक – Ambika Biswas
🥉 तृतीय क्रमांक – Aarth Shekapure
विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेत क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच, क्रमांक मिळाला नाही तरी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचेही कौतुक करण्यात आले. कारण स्पर्धेतील सहभाग, स्वतःची कला सादर करण्याचा आत्मविश्वास आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द हाच खरा विजय आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.
या स्पर्धेचे नियोजन सुरज सोमवंशी सर यांनी केले. त्यांना मुख्याध्यापिका सौ. पूजा पतंगे व हेड मेंबर सौ. स्नेहल नाटक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच Cultural Department मधील सौ. शीतल पवार व सौ. स्नेहल जयसिंगपुरे यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन व आयोजन करून हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. यासाठी सर्व शिक्षकांचेही विशेष सहकार्य लाभले.
🌺 श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, खालुंब्रे परिवाराच्या वतीने सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक कौतुक! 🏆🎨💐





