श्री समर्थ पतसंस्थेस सन २०२५-२६ चा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार

चिंबळी फाटा : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा या संस्थेस पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सन २०२५-२६ साठी प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या कार्याची दखल घेत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या गट क्रमांक ४ – ग्रामीण विभागातून श्री समर्थ पतसंस्थेची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली.

या पुरस्काराचे वितरण बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी रमा रमण मंगल कार्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आले.

मा. आमदार अनिलजी भोसले, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. रेश्माताई भोसले, उपाध्यक्ष श्री. श्यामराव हुलावळे व मानद सचिव श्री. संतोष भेगडे यांच्या हस्ते श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री. संभाजीशेठ गवारी, संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी, खजिनदार श्री. संतोषशेठ गवारी, संचालक श्री. उमेशभाऊ येळवंडे, श्री. नंदकुमार बेंडाले, श्री. समीर बुचडे, श्री. महेंद्र बुचडे, सल्लागार श्री कैलासशेठ येळवंडे, श्री. भगवान साकोरे, श्री. हनुमंत कातोरे, श्री. सर्जेराव गवारी, कार्यकारी सल्लागार श्री. ज्ञानेश्वर ठाकूर, श्री. किसनराव देशमुख, श्री. हरिदास वाडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल गवारे, श्री. प्रदीप लांडगे, श्री. सौरभ गवारे आदी उपस्थित होते.

श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार, प्रभावी कर्जवाटप, उत्कृष्ट वसुली, ग्राहकाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण व्यवसायवाढीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात मिळालेला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार संस्थेच्या वाटचालीतील विशेष अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरला आहे.

या पुरस्कारामुळे संस्थेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अधिक सक्षम, आधुनिक व सभासदाभिमुख सेवा देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.

news portal development company in india
Recent Posts