निघोजे, दि. २३ सप्टेंबर २०२६ : श्री समर्थ स्कूल, निघोजे येथे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना मिळावी तसेच पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थी तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मातीपासून गणपती बनविणे स्पर्धा :
इयत्ता पहिली – प्रथम स्पृहा लाड, द्वितीय स्वरांजली वाघमोडे, तृतीय तनवीर पवार.
इयत्ता दुसरी – प्रथम मृणाली जामदार, द्वितीय श्रेया वामन, तृतीय अन्वित कोकाटे व संस्कृती संतोष.
प्रश्नमंजुषा स्पर्धा :
इयत्ता तिसरी – प्रथम आयत सय्यद, द्वितीय किरण येळवंडे, तृतीय रोशन तायडे.
इयत्ता चौथी – प्रथम मंदिर चौरसिया, द्वितीय लकी कुमार, तृतीय आर्यन पवार व शिवांश येळवंडे.
अथर्वशीर्ष स्पर्धा : प्रथम विराट घोडके, द्वितीय आरव कोकरे, तृतीय आकांक्षा विष्णू गीते.
रांगोळी स्पर्धा : प्रथम मोहिनी नंदू राठोड, द्वितीय पूजा शिंदे, तृतीय राणी पावणे.
मोदक पाककला स्पर्धा : प्रथम अजीम खा, द्वितीय मानसी कोकरे, तृतीय विभावरी चव्हाण.
स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. बक्षिसे स्वीकारताना विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावर्षी गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये ‘Financial Planning’ हा आगळावेगळा आणि समाजोपयोगी विषय मांडण्यात आला. या संकल्पनेच्या माध्यमातून पालकांसाठी विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात आर्थिक नियोजन, बचतीचे महत्त्व आणि भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल गवारे सर यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे सर, संस्थेच्या संचालिका सौ. विद्याताई गवारे मॅडम, प्राचार्य सौ. पल्लवी कुटे मॅडम, उपप्राचार्य ज्योती येळवंडे मॅडम, सौ. साधना आल्हाट मॅडम, कोऑर्डिनेटर प्रियांका येळवंडे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेले प्रोत्साहन, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, आर्थिक नियोजनाचा सामाजिक संदेश आणि गणेशोत्सवाची संस्कृती यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून साधला गेला. त्यामुळे हा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण, आनंददायी आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.





