*जिल्हास्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, खालुंब्रेच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!*
*खालुंब्रे:*
‘युद्धकला मार्शल आर्ट अकादमी’ (Yuddhkala Martial Art Academy)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (District Level Karate Championship 2026) नुकतीच २७ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत *श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, खालुंब्रेच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक पदके आपल्या नावावर केली आहेत.* Best Team ट्रॉफी पण यावेळी यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षक प्राची देवरे मॅम आणि सुरज सोमवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूंची यादी:
*सुवर्ण पदक (Gold Medal):*
शरण्य सचिन बोट्रे (इयत्ता – ४थी)
*रौप्य पदक (Silver Medal):*
काव्या गजानन बावनथडे (इयत्ता – २री)
अजिंक्य राजेंद्र पोहारे (इयत्ता – २री)
परिणिता सुमित सूर्यवंशी (इयत्ता – २री)
शिवन्या सचिन पवार (इयत्ता – ३री)
*कांस्य पदक (Bronze Medal):*
करिष्मा प्रल्हाद रावत (इयत्ता – ८वी)
विराज राजेश फड (इयत्ता – ७वी)
प्रियाल आकाश मेश्राम (इयत्ता – ४थी)
युवराज सचिन रोहमारे (इयत्ता – ७वी)
रागिनी संदीप पुण (इयत्ता – ८वी)
सम्यक राणूल घोडके (इयत्ता – ७वी)
श्लोक सचिन माने (इयत्ता – २री)
काव्या सुनील भिंगारे (इयत्ता – २री)
श्री समर्थ पतसंस्था आणि ग्रुप ऑफ स्कूल चे संस्थापक अध्यक्ष. श्री शिवाजीराव गवारे सर आणि सचिव विद्याताई गवारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच पतंगे मॅडम आणि नाटक मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून, शाळेच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेच्या या यशाने खालुंब्रे परिसरामध्ये व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





