*ॲड. दीपक चव्हाण यांना ‘दैनिक पुढारी’चा मावळ गौरव पुरस्कार*

ॲड. दीपक चव्हाण यांना ‘दैनिक पुढारी’चा मावळ गौरव पुरस्कार

तळेगाव दाभाडे : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे कायदेशीर सल्लागार ॲड. दिपक वसंतराव चव्हाण यांना ‘दैनिक पुढारी’च्या वतीने ‘मावळ गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी तळेगाव दाभाडे येथील वैशाली बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात मावळचे आमदार मा. सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते ॲड. चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वकिली क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची व सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कायदेविषयक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल ॲड. दिपक चव्हाण यांचे श्री समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारी, पदाधिकारी, संचालक, सल्लागार अधिकारी, कर्मचारी तसेच सभासदांनी अभिनंदन केले.

news portal development company in india
Recent Posts