श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल चिंबळी फाटा येथे शासकीय रेखाकला परीक्षा सुरळीत संपन्न
नवीन परीक्षा केंद्रामुळे परिसरातील सात शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय; एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला ३७० विद्यार्थी प्रविष्ट
चिंबळी फाटा :महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी शासकीय रेखाकला परीक्षा श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, चिंबळी फाटा या परीक्षा केंद्रावर सुरळीत व यशस्वीरीत्या संपन्न झाली. सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर ते गुरुवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही परीक्षा पार पडली. यावर्षी विद्यालयाला नवीन परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाल्याने परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा देण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर यांनी दिली.शासकीय रेखाकला परीक्षा ही केवळ गुण मिळविण्याची परीक्षा नसून तुमच्यातील कलागुणांना वाव देणारी, तुमची कल्पनाशक्ती विकसित करणारी आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी एक महत्त्वाची संधी आहे.असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम यांनी केले.
या परीक्षा केंद्रावर परिसरातील एकूण सात शाळांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यामध्ये एलिमेंटरी परीक्षेसाठी २४० विद्यार्थी, तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी १३० विद्यार्थी असे एकूण ३७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
या केंद्रामध्ये श्री समर्थ इंग्लिश मेडियम स्कूल , आनंद इंग्लिश मीडियम स्कूल,कुरुळी, इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई, डी.व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल, चिंबळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरुळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंबळी तसेच श्री संजय शेठ जैद पाटील विद्यावर्धिनी प्रशाला, चिंबळी या शाळांचा समावेश होता. नवीन परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर परीक्षेची सुविधा मिळाली असून पालकांचीही सोय झाली आहे.
परीक्षा कालावधीत महाराष्ट्र राज्य कला व क्रीडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. श्री. किरण सरोदे सर तसेच पुणे जिल्हा कला शिक्षक मंडळाचे कार्याध्यक्ष मा. श्री. हेमंत नागवडे सर यांनी परीक्षा केंद्रास भेट दिली. त्यांनी परीक्षा व्यवस्थेची पाहणी करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षा केंद्राचे यशस्वी नियोजन व संचालन केंद्र संचालक तथा विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. केंद्र समन्वयक म्हणून श्री.अजित थोरात सर यांनी काम पाहिले.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संस्थेचे मॅनेजिंग हेड श्री.राज पवळे सर,नाणेकरवाडी शाखेच्या प्राचार्य सौ.विद्या पवार मॅडम ,निघोजे शाखेच्या प्राचार्या सौ.पल्लवी कुटे मॅडम ,पर्यवेक्षिका नीतू अरोरा मॅडम ,सौ. मोनाली भाडळे मॅडम , सौ. शोभा तांबे मॅडम, सौ. सपना टाकळकर मॅडम , सौ.ललिता बडदे मॅडम,सौ. अश्विनी देवकर मॅडम ,सौ.अनिता लंके मॅडम , सौ.रुपाली सपकाळ मॅडम , सौ. दिपाली थोरात मॅडम सौ. मीनाक्षी पाटील मॅडम ,कलाशिक्षिका सौ. माधवी महाजन मॅडम ,सौ.प्रियंका येळवंडे मॅडम,श्री. जुबेर शेख सर श्री. कृष्णकांत कांबळे सर,सौ. आसावरी वैद्य मॅडम , श्री. श्रीहरी पांचाळ सर , श्री. सचिन जगताप सर , श्री. बाळू अडसरे सर , प्रतीक नेवसे सर, मंगल अनाप मॅडम, योगिता पाटील मॅडम, वैशाली पटले मॅडम, सौ.राधा सोंडगे मॅडम,श्री गजानन इंगळे सर यांनी विशेष सहकार्य केले.
नवीन परीक्षा केंद्राला मिळालेल्या मान्यतेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षा देण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. विद्यालयाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





