*श्री समर्थ पतसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !*
स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे सहकारभूषण पुरस्काराने संस्थेचा गौरव
चिंबळी फाटा : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने संस्थेला *‘स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे सहकारभूषण पुरस्कार’* प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे संस्थेच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान झाला आहे.
हा पुरस्कार विधान परिषदेच्या मा. उपसभापती आमदार नीलमताई गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, सभापती गौरीताई मुऱ्हे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनशेठ गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री. संभाजीशेठ गवारी, श्री. शिवाजीराव गवारी, खजिनदार उपाध्यक्षा सौ. सुरेखाताई गवारी, श्री. संतोषशेठ गवारी, संचालक श्री. उमेशभाऊ येळवंडे, श्री. सुधीरशेठ मुऱ्हे, श्री. कैलासशेठ येळवंडे, श्री. संदीपशेठ येळवंडे, सौ. विद्याताई गवारी, सौ. ललिताताई अनिलशेठ कड, श्री. दीपक कांबळे, श्री. अंकुश नाणेकर, श्री बाबुराव गवारे, श्री. ज्ञानेश्वर ठाकूर, श्री. किसन देशमुख, श्री. हरिदास वाडेकर सीईओ श्री अमोल गवारे व श्री अर्जुन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेने सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य देत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या यशस्वी वाटचालीदरम्यान प्राप्त झालेला हा पुरस्कार संस्थेसाठी विशेष अभिमानाची बाब आहे.
या सन्मानामुळे संस्थेच्या पदाधिकारी, संचालक आणि कर्मचारी वर्गाच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संस्थेचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
**श्री समर्थ पतसंस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.**






